संजीवनी कुलकर्णी - लेख सूची

मन केले ग्वाही

‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ या विषयावर ऑक्टोबरचा विशेषांक काढायचा संपादकांचा मानस आहे. नास्तिक्य हे केवळ देवाला नाकारण्यातून आलेले नसून अफाट वाचन, अभ्यास, विज्ञानाशी त्याची सांगड, चिकित्सा असे सारेच त्यामागे असते, असे त्यांचे म्हणणे आहे. “बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे” अशी ह्या अंकाची मध्यवर्ती कल्पना असावी असे त्यांनी ठरवले आहे. समस्त सृष्टीपेक्षा मनुष्यसमाज असे संपादकांना म्हणायचे आहे …

राष्ट्रीय शिक्षणधोरण २०१९

नवे ‘राष्ट्रीय शिक्षणधोरण २०१९’ येते आहे, हे तुम्हांला सर्वांना माहीत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष निवडणूक जिंकले, त्यासोबतच हा ‘राष्ट्रीय शिक्षणधोरणा’चा तर्जुमा जाहीर झाला. कस्तुरीरंगन यांच्यासारख्या प्रसिद्ध रॉकेटसायंटिस्टच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांच्या समितीने अपेक्षेपेक्षा भरपूर जास्त वेळ घेऊन हा तर्जुमा तयार केलेला आहे. या लेखात त्या तर्जुम्यातील शालेय स्तरापर्यंतच्या भागाचा विचार प्रामुख्याने आलेला आहे. …

संपादकीय

आपल्याच पिल्लांना आपण विटाळावे, त्यांचे बाल्य कुस्करावे असे कुणी माणूस वागते का, असे खरोखर घडते का? या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे. वय, लिंग, नाते, या सर्वांपलीकडे जाऊन सर्वत्र दिसणारी अधम प्रवृत्ती बघितली की माणूस हा विचार करू शकणारा प्राणी आहे या मूळ गृहीतकालाच छेद जातो. हे जग किती सुंदर आहे, प्रेक्षणीय आहे, सुखदायक आहे, …

पुस्तक-परीक्षण : इट टेक्स अ व्हिलेज…..

जगाच्या पाठीवरचे कुठलेही मूल आईबापांच्या वाटेनेच जगात आलेले असले तरी तेवढ्यावरच वाढत नाही. त्याच्या वाढण्यात भोवतालच्या प्रत्येक गोष्टीचा – माणसांचा जनावरांचा घरांचा – बागांचा रस्त्यांचा पुलांचा संस्थांचा व्यवस्थांचा – संशोधनांचा – बाजारांचा जाहिरातींचा त्यामागे असणाऱ्या मानवी मेंदूंचा – त्यांच्या क्षमतांचा, कमीअधिक समजुतदारीचा परिणाम असतो. आणि ह्या सगळ्यांमुळेच मुलांची जी काय व्हायची ती वाढ होत असते. …

एड्सः एक साथ … लक्षवेधी

गोष्ट १९७९ च्या सुमाराची. अमेरिकेतली. न्यूयॉर्कमधल्या एका मोठ्या इस्पितळात रोज सकाळी सगळ्या डॉक्टरांची, प्रमुख नर्सेसची एक बैठक होत असे. इस्पितळातल्या सगळ्या रुग्णांच्या प्रकृतीबद्दल तेव्हा चर्चा होई. लक्षणे, तपासण्याचे निकाल, निदान आणि उपचारांच्या योजना ह्यांचा आढावा घेतला जाई, आणि कार्यवाहीसाठी जबाबदाऱ्यांचे वाटप होई. ह्या बैठका रोजच्याच असत. त्यांची पद्धत ठरलेली, त्यामुळे बैठका चटपटीतपणे उरकत. प्रत्येकच रुग्णांबद्दल …

अभ्यागत संपादकाचे मनोगत

“शिक्षण कशासाठी असते, त्यामागे कोणते हेतू असतात?’ असा प्रश्न जर मी आपल्याला विचारला, तर उत्तर देण्याआधी आपण प्रश्न विचाराल, “कोणते शिक्षण?’ लहान मूल बोलायला शिकते, शाळा-महाविद्यालयात विशिष्ट अभ्यासक्रम विद्यार्थी शिकतात, माणूस अनुभवातून शिकतो, मोटर चालवायला शिकतो, नवी भाषा शिकतो, कला महाविद्यालयात रंगमाध्यमाची काही कौशल्ये हस्तगत करतो, उत्तम कथा-कादंबऱ्यांच्या आकलनातून जीवनाचा अर्थ समजून घेऊ पाहतो, स्वतःला …

शिक्षणामागचे मूलभत हेतू . . . एक प्रश्न

शिकणे ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. माणसाच्या प्रत्येक पिढीने आपली वाटचाल आधीच्या पिढीने सुपूर्द केलेली ज्ञानाची शिदोरी बरोबर घेऊन केलेली आहे. या शिदोरीतील ज्ञानाचे संचित पुढील पिढीकडे सोपवणे हा औपचारिक, अनौपचारिक, किंवा सहज शिक्षणामागचा मूळ हेतू आहे. यामुळे नव्या पिढीचे पाऊल मागच्याहून पुढे पडावे अशीही त्यामागे अपेक्षा आहे. ज्ञानाची उपलब्ध शिदोरी खूप मोठी असते. साहजिकच …

लैंगिकता शिक्षण कशासाठी? कुणासाठी?

‘आमच्या शाळेत लैंगिक शिक्षणाचा कार्यक्रम करायचाय. इ. ८ वी / ९ वी च्या मुलांसाठी/मुलींसाठी, तर तुम्ही याल का?’, असा प्र न प्रत्यक्ष किंवा फोनने, आणि सोबत एक त्याच मजकुराचे पत्र ही माझ्यासाठी वारंवार घडणारी गोष्ट. मी येईन’ असे म्हणते आणि विचारते, ‘हा कार्यक्रम का आयोजित करावा असे वाटते आहे?’ या प्र नाच्या उत्तरात, ‘आम्ही दरवर्षी …

‘धोरणामागचे धोरण’

१२ जून २००१ च्या ‘हिंदू’ मध्ये श्री. राजपूत यांचा लेख वाचायला मिळाला. Inculcating a sense of pride. श्री. राजपूत हे NCERT चे, या धोरणाचा आराखडा मांडणाऱ्या संस्थेचे प्रमुख आहेत, धोरण बनवण्याच्या कामात त्यांचा ‘प्रमुख’ सहभागही आहे. लेखात या धोरणामागचा खरा हेतू श्री. राजपूत यांनी स्पष्ट केलेला आहे, आणि तो आहे, लेखाच्या शीर्षकाचाच — राष्ट्रीय अस्मिता …